नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वडाळीत कमलबाई माळीच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबीर

परिसरातील 32 रक्तदात्यांनी केलं रक्तदान 

नंदुरबार – रविंद्र गवळे
शहादा तालुक्यातील वडाळी येथे कै.सौ. कमलबाई श्रीराम माळी यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी कै.कमलबाई माळी यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शहादा ब्लड बँक व वडाळी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला माजी पंचायत समिती सदस्य गिरीष जगताप, वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नंदकुमार सुरसे, डॉ.सचिन पानपाटील, माजी उपसरपंच हिंमत सोनवणे, प्रयोगशाळा वैज्ञानिक गिरीष जावरे, पत्रकार राजेंद्र सोनवणे, बाबू मण्यार, रविंद्र गवळे, निंबा माळी आदींची उपस्थिती होती. कमलबाई माळीच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराच आयोजन केले जात. या शिबिराला परिसरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या शिबिरात शहादा ब्लड बँकेच्यावतीने डॉ.नाझींन तेली, राजेंद्र कोळी, अब्दुल कादिर, अशोक पावरा, रवि पावरा, सोनाली कोळी, कोमल सोनवणे, सुवर्णा पवार, हिना पाडवी, सपना पावरा, योगिता पवार यांनी रक्त संकलन केले. या शिबिराला गावकऱ्यांसह, तरुणांचे सहकार्य लाभले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:58 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!