नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

45 वर्षाच्या प्रेयसीने, 25 वर्षाच्या प्रियकराचा मृतदेह, मुलाच्या मदतीने निर्जनस्थळी फेकला

प्रतिनिधी (शांताराम दुनबळे) नाशिक :- महिला 45 वर्षांची आणि तो 25 वर्षांचा. वयाने वीस वर्षांनी मोठी असलेल्या महिलेसोबत त्याची ओळख झाली. आणि ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. पण हे प्रेमच त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. ही घटना घडली आहे नाशिकमध्ये. पोलिसांनी याप्रकरणी त्या महिलेसह तिच्या मुलाला आणि मुलाच्या मित्राला अटक केली आहे.

सविस्तर घटना …
25 वर्षांच्या रमेश मोरे याची बस प्रवासात एका 45 वर्षांच्या महिलेशी ओळख झाली. एकमेकांना मोबाईल नंबर शेअर झाले. मोबाईलवरुन सुरु झालेलं बोलणं भेटीत झालं. पुढे भेटी-गाठीही वाढत गेल्या. भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. यासाठी त्याने आपलं घर सोडलं आणि तिच्याच घरी राहू लागला. विशेष म्हणजे 25 वर्षांच्या रमेशहून अवघ्या पाच वर्षांनी लहान म्हणजे 20 वर्षाचा मुलगा या महिलेला आहे.

त्या महिलेने रमेशकडे लग्नाचा तगादा लावला. यासाठी तिने मानसिक आणि शारीरिक छळ सुरु केला. या सर्व गोष्टीला रमेश इतका वैतागला की त्याने टोकाचा निर्णय घेतला. रमेशने त्या महिलेच्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली.

मृतदेह रस्त्यावर फेकला
रमेशने आत्महत्या केल्याने महिला आणि तिचा मुलगा हादरला. या प्रकरणापासून पिछा सोडवण्यासाठी रमेशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी त्यांनी मुलाच्या मित्राचीही मदत घेतली. मुलगा आणि त्याच्या मित्राने रात्रीच्यावेळी रमेशचा मृतदेह दुचाकीवरुन नेला आणि एका निर्जन रस्त्यावर फेकून दिला.
आडगाव परिसरातील एच पी पेट्रोल पंपाजवळ त्यांनी मृतदेह टाकला आणि अपघाताचा बनाव केला. मात्र, पोलीस तपासात हा बनाव पकडला गेला. याप्रकरणी 45 वर्षीय महिला, तिचा मुलगा आणि त्याच्या मित्रावर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:07 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!