प्रतिनिधी
प्रा. भरत चव्हाण
नंदुरबार – शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदी वरील पूल व डामरखेडा गावा जवळील गोमाई नदी वरील पुलाला पडलेले खड्डे बुजवून या दोन्ही पुलांची दुरुस्ती करण्याची मागणी सह प्रकाशा बस थांबा ते केदारेश्वर मंदिरा जवळ वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी गतिरोधक टाकण्याची मागणी करण्यात आली आहे .
या बाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून पुलांची दुरुस्ती व गतिरोधक टाकण्याच्या मागणी साठी ११ मार्च रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे .
या बाबत तहसीलदारांना प्रकाशा येथील ग्रामस्थ , वाहन धारक शेतकरी व्यापारी व पालकांनी निवेदन दिले आहे . निवेदनात म्हटले आहे की प्रकाशा गावा जवळील तापी नदी वरील पूल व डामरखेडा गावा जवळील गोमाई नदी वरील पुलाला मोठ मोठे खड्डे पडले आहे पुलांच्या संरक्षक कठड्यांसह इतर ठिकाणी तडे गेल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे . लोखंडी सळ्या बाहेर आल्याने त्या जीव घेण्या ठरत आहेत . या दोन्ही पुलांवर खड्डे टाळतांना अपघात ही होत आहे . परिसरात ऊसतोड सुरू असल्याने ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली उलटून अपघात होत आहेत . त्यात वाहनासह शेतकऱ्यांचे उसाचे नुकसान होत आहे . प्रकाशा चौपदरीकरण झालेल्या रस्त्याला जोडणारे जोड रस्त्यांचीही दुरुस्ती करण्याची गरज आहे ,
या बाबत जिल्हाधिकारी , ते शहादा दरम्यान प्रांताधिकारी , तहसीलदार व रस्ते विकास मंडळाला वारंवार लेखी निवेदने देऊनही काहीही उपाय योजना होत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे . प्रकाशा या रस्त्यावर शाळा – महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला ही धोका निर्माण झाल्याने तत्काळ गतिरोधक टाकण्याच्या मागणीसाठी ११ मार्च रोजी प्रकाशा येथील ग्रामस्थ , शेतकरी , पालक , वाहन धारक चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करणार असून , व्यावसायिक सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत दुकाने बंद ठेवून निषेध करणार आहेत .
या आंदोलना नंतर ही दखल घेण्यात आली नाही तर प्रकाशा ग्रामस्थ महसूल विभागाचा कोणताही कर भरणार नाहीत , असे निवेदन तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांना सोमवारी हरी दत्तू पाटील व ग्रामस्थांनी दिले या निवेदना वर प्रकाशा येथील शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत .



