नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बामखेडा महाविद्यालयात जागतिक महिलादिन व व्यक्तिमत्त्व विकास व्याख्यानमाला संपन्न

नंदुरबार – रविंद्र गवळे

बामखेडा त.त.(ता.शहादा) येथील ग्राम विकास संस्थेच्या कला महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अम्रुत महोत्सवी वर्षात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास व्याख्यानमाला संपन्न झाली. विद्यापीठ व महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग आणि युवती सभा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमाला संपन्न झाली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सर्वप्रथम महिलांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपन व वृक्षांना सेंद्रिय खत देऊन वृक्षसंवर्धन प्रयत्न झाला. व्याख्यानमालेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.बी.पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झाले. सेवानिवृत्त असिस्टंट कमिशनर व संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.के.एच. चौधरी यांनी व्याख्यानमालेचे उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री.बी. व्ही. चौधरी होते. उद्घाटन समारंभाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले व सरस्वतीचे प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांनी केले. याप्रसंगी कु.मयुरी हिरे हिने महिला दिनानिमित्त ‘सक्षम महिला’ या विषयावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील कार्यक्रमाचे औचित्य साधून इतिहास विभागप्रमुख डॉ. वाय. सी.गावित यांनी प्राप्त केलेल्या पीएच.डी. बद्दल व कु.मयुरी हिरे हिने प्रीआयएएस ट्रेनिंग प्रिलीम परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल सन्मान करण्यात आला. त्यानंतर एकूण चार सत्रात व्याख्यानमाला संपन्न झाली. जीवन कौशल्ये, विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाचे पैलू व प्रयत्न, स्त्री पुरुष समानता, स्त्री जन्मा तुझे स्वागत या विषयांवर डॉ.मृणाल जोगी, डॉ. मनीषा वर्मा, संगीता पाटील व डॉ. हर्षदा पुराणिक यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. व्याख्यानमालेत महिला सबलीकरण विषयाला केंद्रभूत मानून महिला सुरक्षेविषयी जाणीवजागृती झाली. व्याख्यानमालेचा समारोप प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. व्याख्यानमालेत परिसरातील एकूण आठ महाविद्यालयातील 57 विद्यार्थिनींचा सहभाग होता. समारोप प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थिनींना समारंभपूर्वक प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने उत्तमरीत्या वैचारिक मेजवानी महिला दिनाच्या दिवशी प्राप्त झाल्याबद्दल विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले. शेवटी आभार प्रकटन युवती सभा विभागप्रमुख डॉ.के.पी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बी. एन. गिरासे यांनी केले. याप्रसंगी संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस.एस.चौधरी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापक इतर वर्ग यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:23 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!