नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शबरी तथा रमाई घरकुल योजनेचे उद्दिष्ट वाढविण्याबाबत आरपीआय आठवले पक्षाच्या वतीने जि . प . मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी- प्रविण चव्हाण

नंदुरबार – नंदुरबार येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांची अमळनेर विधानसभा मतदार संघाचे मा.आ. शिरीष चौधरी यांच्यासह नंदुरबार आरपीआय आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी सदिच्छा भेट घेतली व नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने शबरी व रमाई घरकुल योजनेचे लाभार्थ्यांचे उद्दिष्ट वाढविण्या बाबत निवेदन दिले . या निवेदनात युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी म्हटले आहे की , यापूर्वी शबरी व रमाई घरकुल योजनेचे लाभासाठी जिल्ह्यातील आदिवासी , दलित बांधवांनी अर्ज सादर केलेले आहेत . परंतु आदिवासी व दलित समाजाच्या जिल्हानिहाय लोक संख्ये नुसार लाभार्थ्यांची संख्याअतिशय नगण्य आहे . त्यामुळे सदर योजनेचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत नाही . तरी शबरी तथा रमाई घरकुल योजनेचे उद्दिष्ट किमान गाव निहाय दुप्पट करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:31 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!