वडाळी प्रतिनिधी-( p.c. पटेल) वडळी ता.शहादा येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या १९५ व्या. जयंतीनिमित्त उत्सव समितीची कार्यकारिणी गठित करण्यात आली.शहादा तालुक्यातील वडाळी येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर महादेव मंदिरात ईश्वर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्सव समितीची कार्यकारिणी सर्वानुमते गठित करण्यात आली.यात अध्यक्षपदी योगेश माळी,उपाध्यक्षपदी जयेश सोळंके,कार्याध्यक्ष ललित जगताप,सचिव सौरभ झाल्टे, सहसचिव तुषार सोनवणे, सल्लागार सागर कोळी, सदस्यपदी दर्शन धनगर,शैलेश माळी,नंदकिशोर गोसावी,सुनिल ठाकरे,स्वप्नील चौधरी,कमलाकर खलाणे यांची एकमताने निवड करण्यात आली.बैठकीला अरुण जाधव, सुनिल माळी,संदिप सोनवणे,निलेश बावा,देविदास माळी,निखिल माळी,संजय माळी आदींची उपस्थिती होती.



