नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गुरे वाहून नेणारे वाहन पोलिसांनी पकडले गुन्हा दाखल ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त.

प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार -शहरातील धुळे रोड वरील कृषी महाविद्यालयासमोर अवैधरीत्या गुरे वाहून नेणारे पिकअप वाहन पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले . याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे .
नंदुरबार शहरातून धुळ्याकडे जाणाऱ्या एमएच २० ईएल ७२७६ या पिकअप वाहनातून गुरांची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती . यानुसार कृषी महाविद्यालया समोर पिकअप वाहन थांबवले होते . यावेळी झालेल्या तपासणीत गुरे दाटीवाटीने बांधण्यात आल्याचे दिसून आले होते .
वाहतूक करणाऱ्यांकडे वाहतूक परवाना किंवा फिटनेस प्रमाणपत्रही नसल्याचे समोर आले होते . यातून पोलिसांनी १ ९ हजार रुपयांची तीन गुर आणि ५ लाख रुपयांचे पिकअप वाहन असा ५ लाख १ ९ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला .
या प्रकरणी पोलीस नाईक स्वप्नील पगारे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पिकअप चालक शकील खान शरीफ खान पठाण , रा . अजिंठा , ता . सिल्लोड , जि औरंगबाद व शुभम संजय आव्हाड , रा दिग्रस , ता . सिल्लोड , जि . औरंगाबाद यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे . तपास पोलीस नाईक अमोल जाधव करीत आहेत .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:17 pm, January 13, 2025
temperature icon 27°C
साफ आकाश
Humidity 33 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!