नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील “शिपाई” एसीबीच्या जाळ्यात…..

जळगाव प्रतिनिधी:- जळगाव येथील सुशिक्षित बेरोजगार युवकाला माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सिक्युरिटी गार्ड नोकरीसाठी 2 लाख 10 हजार रुपयाची लाचेचा पहिला टप्पा तीस हजार रुपयाची लाच घेताना सहाय्यक आयुक्त कार्यालयातील शिपाईला एसीबीने रंगेहात ताब्यात घेतले.

जळगाव मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार असुन त्यांनी मा.जळगाव जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ जळगाव कार्यालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कंत्राटी सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी मिळणेबाबत अर्ज सादर केला होता. सदर कंत्राटी सिक्युरीटी गार्डची नोकरी लावून ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे साहाय्यक कामगार आयुक्त येथील शिपाई गोपाळ कडू चौधरी, वय-55,रा.जुना खेडी रोड,जळगाव यांनी पंचासमक्ष प्रथम 2 लाख 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.आज दि 11 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जळगाव परीससरात लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता.सदर लाचेच्या रक्कमेपैकी पहिला हप्ता म्हणून 30 हजारांची लाच स्विकारतांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने शिपाई गोपाळ चौधरी याला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई तपास अधिकारी-शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव तसेच सापळा व मदत पथक- उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत एस.पाटील, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:06 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!