नंदुरबार – रविंद्र गवळे
नवी हिंगणी ता. शहादा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये दि.13 ला शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याच्या सुरुवातीला शैक्षणिक वर्ष 2022-23 ला शाळेत प्रवेश पात्र असणाऱ्या नवागत विदयार्थ्याचे संपूर्ण गावात वाजत गाजत मिरवणूक काढली. त्यानंतर त्या चिमुकल्यांचे मातेसह औक्षण करून त्यांना मुकुट, सैश, घालून गुलाबपुष्प, फुगा व चॉकलेट देण्यात आले .
मेळाव्याचे उद्घाटन मा.केंद्रप्रमुख प्रकाश माळी सर व गावाचे धुरंधर राजकारणी तसेच समाजकारनी चंद्रकांत पटेल यांनी केले. आकर्षक फुलांचा सेल्फी पॉईंट, सुंदर असे मुकुट, रंगीबेरंगी सॅश, फुगांची आकर्षक सजावट इ. उत्कृष्ट कलाकुसरीचा वापर हे चिमुकल्यांचे व गावातील सर्वांचे आकर्षणाचे केंद्र ठरले.प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. शिंपी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती हाडे ढवळे यांनी केले. प्रसन्न वातावरणात दाखलपात्र मुलांचे विकासपत्र भरून घेण्यात आले. विकास पत्रातील शरिरिक विकास, बौदीक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी इ. साहाय्याने मुलांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष हिरामण कोळी सरंपच संगीता पवार, इ. उपस्थित होते. या मेळाव्याच्या आयोजनासाठी मयुर धनगर, दिपाली बोरसे, चंद्रकला पवार, आबा मोरे, वसीलाल मोरे, मनीषा पाटील, यांचे विशेष सहकार्य लाभले.



