नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शहादा, तालुक्यातील म्हसावद येथील आरोग्य मेळाव्यात ५०० जणांची तपासणी

प्रतिनिधी – राहुल आगळे

शहादा तालुक्यातील म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालय येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय भारत सरकार व आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित व् मोफत आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या शिबिराचे उद्धाटन खा. हीना गावित , आ. राजेश पाडवी, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी होत्या. त्यांच्या शुभ हस्ते याहा मोगी माता प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलीत करुन कार्यक्रमला सुरुवात करण्यात आले.
यावेळी खा. डॉ. हीना गावित यांनी सांगितले की, आदिवासी बांधवांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन तत्पर तयार आहे. कोणत्याही रुग्ण कोणत्याही प्रकारच्या उपचारासाठी केंद्र स्तरावर सर्व सुविधा देण्यात येईल केंद्र सरकारने आरोग्य विषयी धोरण बाबतीत माहिती दिली. त्यानंतर आ. राजेश पाडवी यांनी लहान मुलांच्या ह्रदयाच्या होल बाबत व आरोग्य धोरण बाबत माहिती दिली.
त्यानंतर अध्यक्षीय भाषणात ॲड. सीमा वळवी यांनी सांगितले की, कोणत्याही रुग्णाला कोणत्याही प्रकारे उपचारासाठी जिल्हा स्तरावर किंवा जिल्हा बाहेर नाशिक मुंबई जरी रुग्णाला घेऊन जाण्याची आली तरी सर्व सुविधा उपलब्ध करुण देण्यात येतील शासना ने आरोग्य ला प्रथम प्राधान्य दिले आहे. शिबिरात जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ञ डॉक्टर त शिबिरात पाचशेहून अधिक रुग्णांची तपासणी करून योग्य उपचार व निदान करण्यात आले रुग्णांना आली होती.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रजनीताई नाईक, जि. प. सदस्य मोहन शेवाळे, जि. प. सदस्या वंदना पटले,, जि. प. सदस्या कविता पावरा, जि. प. सदस्य सुभाष पटले, जि. प. सदस्य मोगरा पटले, जि. प. सदस्या मीना ठाकरे, जि. प. सदस्या भारती भील, जि. प. सदस्या गुलाल भिल, जि. प. सदस्या कुंदाबाई नाईक, शहादा पंचायत समिती सभापती श्रीमती बायजाबाई भील, उपसभापती श्रीमती वैशाली पाटील, पंचायत समिती सदस्या श्रीमती कमलबाई ठाकरे, पंचायत समिती सदस्य सत्तेन वळवी, शांतीलाल पाटिल, भानुमती ईशी, शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश नाईक, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील, माजी कृषि सभापती डॉ. भगवान पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जाधव ठाकरे व. डॉ. योगेश पावरा, ग्रामसेवक पी. बी गिरासे हे उपस्थित होते.
शहादा तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय म्हसावद तेथे दंत व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते डिजिटल आयडी युनिक हेल्थ महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हे दोन्ही योजनांचे कार्ड बनविण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड बनविणे वाटप करणे अवयव दान बाबत जनजागृती करणे योगा शिबिर जनजागृती करणे डिजिटल आयडी रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:37 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
20 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!