नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार10 युवकांना पोलिसांनी घेतले ताब्यात


। कर्जत । जयेश जाधव ।कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दहा महाविद्यालयीन तरूणांनी हा अत्याचार केल्याची माहिती समोर येत असून या तरूणांना आता कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पनवेल न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली आहे
कर्जत तालुक्यातील गौरकामत  येथे राहणार्‍या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तेथेच राहणार्‍या काही तरूणांनी सुरूवातीला जवळीक करत तिच्यावर अत्याचार केला होात. यानंतर याचा व्हिडीओ तयार करून या 10 तरूणांनी ब्लॅकमेल करीत अत्याचार केला आहे. याबाबात पोलीस ठाण्यात या मुलीने सोमवारी (दि.18) तक्रार दाखल केल्याने गावातच राहणार्‍या काही तरूणांना व परिसरातील तरूणांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून, त्यांना तहसील कार्यालय येथील कोठडीत सुरूवातीला ठेवण्यात आले असून त्यांना पनवेल सेशन कोर्टात हजर  केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे . एकूणच तालुक्यात याअगोदर देखील असे गुन्हे दाखल करण्यात आले असून या 13 वषी्रय मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे कर्जत तालुका पूर्णपणे हादरून गेला आहे. तर अत्याचार करणारे काही तरूण हे 20 वर्षीय कॉलेज तरूण असल्याची माहिती यावेळी कर्जत पोलिसांकडून देण्यात आली असून काही तरूण वेगवेगळ्या क्षेत्रात आपले करीयर करीत असल्याचे बोलले जात आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:00 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!