- शेतकऱ्याची विज वितरण कंपनीकडे नुकसानभरपाईची मागणी
प्रतिनिधी-:भुवनेश दुसाने / पाचोरा
तारखेडा बु” येथील बाबुंच्या शेतास विज तारांच्या शाॅर्ट सर्कीटमुळे २ हजार ३०० बाबुंची झाडे जळुन खाक झाल्याची घटना घडली असुन नुकसानग्रस्त शेतकऱ्याने विज वितरण कंपनीच्या तारखेडा येथील उप शाखा अभियंता यांचेकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज दिला आहे.
पाचोरा तालुक्यातील तारखेडा बु” शिवारात अविनाश विष्णु पाटील व सुनिता विष्णु पाटील यांची गट क्रं. ७७ / १ व गट क्रं. ७७ / २ ही शेतजमिन आहे. अविनाश पाटील यांनी १० एकर शेत जमिनी पैकी ७ एकर जमिन क्षेत्रात ४ वर्षांपूर्वी बाबुंची लागवड केली होती. सद्यस्थितीत बाबुंच्या झाडांची उंची २० ते २५ फुट झाल्याने त्यांच्या शेतावरुन विज वितरण कंपनीच्या विद्युत तारा गेलेल्या आहेत. दि. २२ एप्रिल रोजी दुपारी विज तारांमध्ये शाॅर्ट सर्कीट झाल्याने ७ एकर मधील २ हजार ३०० बाबुंची झाडे जळुन खाक झाली आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी अविनाश विष्णु पाटील व सुनिता अविनाश पाटील यांनी नुकसान भरपाई मिळावी तसेच भविष्यात असा प्रकार होवु नये म्हणुन आमच्या मालकीच्या शेतावरुन गेलेल्या विद्युत तारा इतरत्र हलविण्यात याव्यात अशी मागणी महावितरण कंपनीचे लोहटार येथील उपशाखा अभियंता यांना दि. २३ एप्रिल रोजी केली आहे.



