प्रतिनिधी उमेश महाजन
एरंडोल: येथे जहांगिरपुरा भागात रूपाली विश्वनाथ पाटील वय ३४ वर्ष या विवाहितेने घरातील वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ एप्रिल २०२२ शनिवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. रूपाली हि ने घरातील पंख्याला साडी ने गळफास घेतलेला आढळून आला याबाबत मृताचे पती विश्वनाथ पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली आहे.
विश्वनाथ पाटील हा मालवाहतूक रिक्षा व शेती व्यवसाय करीत असून त्याची पत्नी रूपाली ही ब्युटी पार्लर व शिवणकाम करीत २३ एप्रिल रोजी विश्वनाथ हा त्याची मालवाहतूक रिक्षा घेऊन रिंगणगाव येथून परत येत असताना विखरण गावाजवळ आला असता त्याला फोन वरून त्याच्या घराजवळ लोकांची गर्दी जमल्याचे सांगण्यात आले. तो घरी पोहोचल्यावर त्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याला समजले. गल्लीतील नागरिकांसोबत विश्वनाथ हा वरच्या मजल्यावर जाऊन पत्नी रूपाली येणे गळफास घेतलेला आढळून आला तेव्हा ॲम्बुलन्स मध्ये टाकून तिचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला तपासणीअंती तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
विश्वनाथ याला एक मुलगा एक मुलगी वडील व आई असा परिवार आहे.