नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गुरांना वाचवण्याचा प्रयत्नात गाडी शंभर फुट खोल दरीत कोसळली; वनविभागाच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

नंदुरबार – रवींद्र गवळे
शहादा तालुक्यातील
म्हसावद ते तोरणमाळ रस्त्यावर असलेले लेघापाणी ते कोटबांधणी गावाजवळ घाटाच्या वळण रस्त्यावर गुरांना वाचविण्याचा प्रयत्न करताना शंभर फुट खोल दरीत गाडी कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याबाबत म्हसावद पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सुत्रानुसार माहीती अशी की,मंगळवारी संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान निवृती शिवदास पाटील(वय 44) वनकर्मचारी वनकार्यालय तोरणमाळ(ह.मु.श्रीहरीनगर,कांकरीया भवनमागे देवपूर धुळे) हा सरकारी टपाल देणेकामी राणीपूर येथे स्वतःच्या गाडी क्र.एम.एच.01 सी.व्ही.4031 ने येत असताना लेगापाणी ते कोटबांधणी गावाजवळ घाटात अचानक गुरे आडवे आल्याने गुरे वाचवण्याचा प्रयत्नात गाडी 100 फुट खोल दरीत कोसळल्याने तोंडाला,डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला तातडीने म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला डॉक्टरानी मयत घोषित केले. वैद्यकीय अधिक्षक डॉ.ए.आर.शेख यांनी मयताचे शव विच्छेदन करुन प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत म्हसावद पोलीसात संजय हिरामण पवार(वय 45) वनपाल तोरणमाळ यांनी फिर्याद दिल्यानुसार भादवी कलम 304(अ) 279, 337,338,427 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पुढील तापस पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखली जमादार फुलसिंग पटले हे करीत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!