उरण प्रतिनिधी (दिप्ती पाटील) :– नुकताच उरण येथील जेएनपीटी मंल्टिपर्पस हाॅल मध्ये उरण तालुक्यातील प्रसिद्ध मेक अप आर्टिस्ट सौ. मानसी सिंग आयोजित भव्य सौदर्य परिसंवाद,अभ्यास वर्गाचे आयोजन मानसी अकॅडमी च्या माध्यमातून करण्यात आले होते.
या भव्य सौदर्य परिसंवादात स्वतः मानसी सिंग यांनी मेक अप, स्किन,हेअर स्टेटनिंग,हेअर स्मुथनिंग आयुर्वेद ,सौदर्य प्रसाधने याविषयावर मार्गदर्शन केले. तसेच तरुण वयात युवतींना भेडसावणाऱ्या तारुण्य पिठीका, मुरमे, चेहर्यावरील ऋतू मुळे हार्मोन मुळे येणाऱ्या फोडी बद्दल सखोल माहिती आणि उपाय सुध्दा करण्याबद्दल माहिती दिली. सौदर्य संबंधित गाढा अभ्यास असणारी मानसी सिंग हि उरण तालुक्यातील ज्युनियर शेहनाज हुसेन या टोपण नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेच. पण एक उत्कृष्ट मेक अप आर्टिस्ट , उत्तम व्यवसाइईक मेक अप आर्टिस्ट सुध्दा आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध ममता काॕस्मॕटीक आर्ट ज्वेलर्स पनवेल, आणि उरण मुंबई येथुन ज्वेलरी शाॕप धारकांनी सुध्दा उपस्थिती दर्शविली होती.
मानसी अकॅडमी मध्ये ज्या विद्यार्थीनी बेसीक ब्युटी पार्लर चे कोर्सेस केले होते. त्याचा बक्षीस प्रमाणपत्र वितरण सोहळा सुध्दा साजरा करण्यात आला.
या परिसंवादा मधील सर्वात आकर्षक कार्यक्रम रॅम्पवाॅक म्हणजे मराठीत (चालण्याचा आकर्षक धंग) या मध्ये माॅडेल अनुष्का टोपनो, दिव्या म्हात्रे, साक्षी म्हात्रे आणि नाजूक ललणा दर्शना ( प्रिया) भोमकरच्ये आगमण होताच मंल्टिपर्पस हाॅल शिट्या, टाळ्यानी दुमदुमून गेला. अशा या आनंददायी कार्यक्रमासाठी हाॅल ची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मानसी अकॅडमी तर्फे जेएनपीटी महिला मंडळाचे विशेष आभार!



