नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नंदूरबार जिल्ह्यातील अतिउष्माघाताने एकाचा मृत्यू ; ओळख पटविण्याचे आवाहन. पोलीस दलाचे आवाहन..

प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार :- नंदूरबार तालुक्यातील पातोंडा शिवारात अति उष्माघाताने एका 35 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . याबाबत ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नंदूरबार तालुक्यातील पातोंडा शिवारात संतोष मुकुटलाल शहा यांच्या शेतातील बांधावर 35 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला . रंग काळा , अंगात तपकीरी व पांढरे पट्टे असलेला चौकडीचा फुल बाहीचा शर्ट , फुल पॅन्ट , दाढी वाढलेली , काळे केस असे वर्णन त्या इसमाचे आहे , अतिउष्माघाताने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे .
या बाबत राकेश तुकाराम पटेल यांनी पोलिस ठाण्यात खबर वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . वरील वर्णनाचा इसमाचा नातेवाईकांनी शोध घेण्याचे आवाहन उपनगर पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील येळवे यांनी केले आहे .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:09 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!