प्रतिनिधी शांताराम दुनबळे. नाशिक–इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरण परिसरात अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या व घोटी पोलिसांना यश आले . तो अर्धवट जळालेल्या नाशकातील वडाळा येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुजाहिद अमजद खान ऊर्फ गोल्डन गोल्डी असे मृताचे नाव आहे . इंदिरानगर पोलिसांनी त्याला दोन वर्ष तडीपार केले होते . या घटनेतील एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलीस तपास करीत आहे . वैतरणा धरण परिसरात राजाराम खातळे यांच्या शेतानजीक मंगळवारी सकाळी ६ वाजता अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता . मयत मुजाहिद खान वय वर्ष ( २३ ) याच्याविरोधात नाशिक , इंदिरानगर अंबड येथील पोलिस ठाण्यांत मयत मुजाहिद अमजद खान यांच्या वर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत . गुन्हेगारी स्वरूपाच्या टोळीतील आपआपसातील वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिस यांचा प्राथमिक अंदाज आहे . मृत मुजाहिद व संशयितांनी प्रथम मुंबई व नंतर नाशिक येथे एकत्रित मद्य प्राशन केले . नंतर मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खुन केल्यानंतर चारचाकी वाहनातून वैतरणा धरण परिसरात प्लॅस्टिक गोणीत टाकून जाळण्यात आल्याची माहिती संशयिताने दिली . इतर संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत . लवकरच सर्व गुन्हेगार पकडण्यात येतील , असे ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगने , विभागीय अधिकारी कल्पना फडतारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील , सहायक निरीक्षक दिलीप खेडकर , उपनिरीक्षक अनिल धुमसे हवालदार शीतल गायकवाड , संतोष दोंदे , पंकज दराडे , हेमंत तुपलोंढे बिपीन जगताप यांनी हा तपास केला . उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह तरुणाच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आला .



