नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नंदुरबार शहर गुन्हे पथकाने
अट्टल गुन्हेगारास : अवघ्या २४ तासात ठोकल्या बेड्या !!

प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार – : नंदूरबार शहरातील गणपती मंदिर परिसरात असलेले दुकान फोडून चोरट्यांनी ३० हजार रुपये किंमतीची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली होती .
दरम्यान गुन्ह्यातील संशयित हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सात ते आठ गुन्हे असताना त्याला शहरातून हद्दपार करण्यात आले होते तरी देखील या चोरट्याने नंदुरबार शहरात धाडसी चोरी केली आहे.
दरम्यान नंदुरबार शहर गुन्हे पथकाने या अट्टल गुन्हेगारास २४ तासाचा आत जेरबंद केले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील गणपती मंदिर रोड युनियन बँक एटीएम समोर असलेल्या घेवचंद धनराज नावाच्या किराणा दुकानात संशयित संतोष दिलीप तिजवीज, वय (२९) रा बाहेरपूरा नंदुरबार याने चोरी करून सुमारे ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता.त्याच्या कडून १३ हजार ३२० रुपये रोख मिळाले असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नंदुरबार येथील हितेश अशोक जैन यांचे गणपती मंदिर परिसरात किराणा दुकान आहे . सदर बंद दुकानाचे कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानात असलेल्या लोखंडी कपाटातून ३० हजार रुपये किंमतीची रोकड चोरुन नेली . याबाबत हितेश जैन रा . वैशाली नगर , एम. एल.टाऊन , नंदूरबार यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५७ , ३८०प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नंदुरबार व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेज नंदुरबार पोलीस ठाण्याचे शहर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत विजय मोहिते व नंदुरबार शहर गुन्हे पथकाने केली आहे.व पुढील सदर चा तपास करीत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:00 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!