नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मुलीच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी, जन्मदात्या आईलाच दिली कायमची सुट्टी

DPT News Network मुंबई : प्रेम इतकं आंधळ आणि वेड करेल याची कल्पनाही करू शकणार नाही. प्रेमात अडसर ठरणाऱ्या जन्मदात्या आईलाच मुलीने संपवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे औरंगाबादमधील अंबिकानगर, मुकुंदवाडी परिसरात खळबळ उडाली.

मुलीच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी एवढी घट्ट होती की जन्मदात्या आईला संपवतोय याचं दु:खही तिला नसावं. तिने प्रियकराच्या मदतीने शेतात बोलवून आईला संपवण्याचा डाव रचला. 

सुशीला संजय पवार असं मृत महिलेचं नाव आहे. त्यांच्या मागे दोन मुलं आणि एक मुलगी आहे. सुशीला या हातगाडीवर भाजी विकून उदरनिर्वाह करायच्या. रविवारी रात्री उशिरा त्यांना फोन आला. त्या फोननंतर त्या बाईकने शेतात गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुशीला यांचा पत्ताच नव्हता. 

नातेवाईकांनी सुशीला घरी न आल्यानं शोधाशोध सुरू केली. त्यांचा मृतदेह बाळापूर शिवारात आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनंतर चौकशी झाली तेव्हा घरातील काही दागिने आणि पैसेही गायब असल्याचं समजलं. 

पोलिसांनी मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स काढले त्यावेळी प्रकरणाचा खुलासा झाला. मृत सुशीला यांच्या फोनवर मुलीचा फोन होता. त्यांनी शेतात बोलवून घेतल्याचं समजलं. 

मुलीने प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईवर धारदार शस्त्राने वार करून संपवलं. त्यानंतर मुलगी घरी गेली तर प्रियकर फरार झाला. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
1:00 pm, January 13, 2025
temperature icon 25°C
साफ आकाश
Humidity 36 %
Wind 10 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!