नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोपर्ली येथे ज्वेलर्सचे दुकान फोडुन चोरट्यांनी ३० हजाराचा मुद्देमाल केला लंपास.



प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार – नंदूरबार तालुक्यातील कोपर्ली गावातील साईदर्शन ज्वेलर्स दुकान फोडुन चोरट्यांनी ३० हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली गावात असलेले साईदर्शन ज्वेलर्स दुकान व त्या शेजारी असलेल्या मेडीकल दुकान चोरट्यांनी फोडले . साई ज्वेलर्सचे व मेडीकलचे शटर उचकवुन चोरट्यांनी आत प्रवेश केला . ज्वेलर्स दुकानातुन २४ हजार ६५० रु . किंमतीचा तीन ग्राम वजनाचा मोती व अमेरीकन डायमंड असलेल्या चांदीच्या एकुण १७० अंगठ्या तसेच मेडीकल दुकानाच्या गल्ल्यातुन रोख ५४०० रुपये असा एकुण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविण्यात आला .
चोरीची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राहुलकुमार पवार आपल्या पथकासह कोपर्ली गावीपोहचले . त्यांनी चोरी झालेल्या दुकानांची पहाणी केली . श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते ,
याबाबत रुपेश सुमनलाल सोनार यांच्या फिर्यादी वरुन अज्ञाताविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम ४५७ , ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन ,
पुढील तपास पोकॉ सुनिल अहिरे करित आहे .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:29 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!