नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नवी मुंबईत पार्किंगवरून एकाला हॉकी स्टिकने मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

प्रतिनिधी – अमित कुलकर्णी


मुंबई: नवी मुंबईतील खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या अंबिका नगर या सोसायटीमध्ये वाहन पार्किंगवरून एकाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सोसायटीमध्ये सातत्याने वाद निर्माण करणाऱ्या, दोघा गाव गुंडांनी त्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका इसमाला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या दोन्ही रहिवाश्यांमध्ये वाहन पार्किंग वरून वारंवार वाद होत होते. मात्र या वादाचे रूपांतर आता तुंबळ हाणामारीत झाले आहे. या दोन गाव गुंडांनी हॉकी स्टिकने मारहाण केल्यावर पोलीस ठाणे गाठत आपल्यालाच मारहाण करण्यात आली असल्याची खोटी नोंद केली.
पण सीसीटीव्ही समोर आल्याने पोलीस देखील हैराण झाले. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या दोन्ही गाव गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. तक्रारदारावर रुग्णालयात उपचार सुरू असून खांदेश्वर पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:10 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!