नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दारूची अवैध वाहतूकीवर; शिरपूर पोलिसांची कारवाई

(प्रतिनीधी मनोहर पाटील )धुळे : शिरपूरमधून दारूची वाहतूक करणारे मारुती ईको वाहन पकडून शिरपूर शहर पोलिसांनी त्यातून जवळपास 2 लाख 65 हजार 200 रुपयांची दारू जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात देखील घेतले आहे.

महाराष्‍ट्र– मध्‍यप्रदेश सिमावर्ती भागात अवैध दारूची वाहतुक मोठ्या प्रमाणात होत असते. पोलिसांकडून अनेकदा कारवाई होवून देखील ही दारूची चोरटी वाहतुक अजूनही सुरू आहे. त्‍यानुसार अवैध वाहतुक होत असलेल्‍या दारूचा साठा पोलिसांनी जप्‍त करण्याची कारवाई शिरपूरमध्‍ये पोलिसांनी केली आहे.

कारमध्‍ये चाळीस बॉक्‍स

पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना वाघाडीहुन बाळदे मार्गाने दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून एक संशयीत कार आढळली. त्‍याची तपासणी करत असताना पोलिसांना कारमध्ये जवळपास देशी- विदेशी दारूचे 40 बॉक्स आढळून आले. पोलिसांनी कारसह संपूर्ण दारूसाठा व कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!