नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोठली येथे घराला लागली आग संसार उपयोगी साहित्य जळून राख; आग विझवितांना एक तरुण जखमी


*नंदुरबार – रवींद्र गवळे*
शहादा तालुक्यातील कोठली येथे जिजाबाई पाटील व हिरकन बाई पाटील या दोघेही महिलेच्या मालकीची राहते घरांना सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागून आगीत संसार उपयोगी वस्तू अन्नधान्य अशा विविध वस्तू सह घरात ठेवलेल्या ५० हजार रुपये या रोख रकमेसह संपूर्ण संसारोपयोगी वस्तू अन्नधान्य कपडे जळून खाक झाल्याने कुटुंबच उध्वस्त झाले असून रस्त्यावर आले आहेत. त्यात सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरीआग विझवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या येथील युवक गोविंदा पाटील गंभीर स्वरूपात भाजल्याने त्याला धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आले आहेत प्राथमिक अंदाजानुसार दोघही घरांच्या संसारोपयोगी वस्तू व रोख रकमेसह साडेतीन लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचे कळते.
शहादा तालुक्यातील कोठली येथील रहिवासी जिजाबाई अभिमन पाटील यांचे दहा गाळे घर शॉर्ट सर्किटमुळे सकाळी साडे आठच्या दरम्यान आग लागून त्यात संपूर्ण संसारोपयोगी वस्तू अन्नधान्य व त्यासोबत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मार्फत कर्ज काढून घरात ठेवलेले पन्नास हजार रुपये रोख रक्कम तेही जळून खाक झाल्याने कुटुंब उध्वस्त झाले शेजारी असलेल्या इरक्कं बाई उत्तम पाटील यांचे ही घराचा मागील भाग रोहित जळून संसार उपयोगी वस्तू झाल्यावर सुमारे दोन तास चाललेल्या अग्नीने रौद्ररूप धारण केल्याने शहादा येथील अग्निशामक बंब तात्काळ पाचारण करण्यात आले मात्र तत्पूर्वी गावातील ग्रामस्थांसह युवा वर्गाने आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात गोविंदा पाटील हा युवक आज विझवताना गंभीर स्वरूपात जखमी झाल्याने शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल झाले त्यानंतर त्यास धुळे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. असून त्याची प्रकृती स्थिर आहे यावेळी सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी आणि आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन आग विझवण्यासाठी मदत केली जिजाबाई अभिमन पाटील या महिलेचे साधारण दोन लाख रुपयाचे संसारोपयोगी वस्तू अन्नधान्य पन्नास हजार रुपये रोख असे अडीच लाख रुपयांचे आगीत जळून खाक झाले त्यांच्या शेजारीच असलेले हिरकणबाई उत्तम पाटील या महिलेचे दहा गाळ्या पैकी दोन गाळे घर व त्यातील संसार बघा वस्तू असे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज असल्याची माहिती येथील माजी सरपंच अशोक मंडळे पोलीस पाटील सुखदेव पाटील यांनी दिली असून महसूल विभागला घटनेची माहिती दिली असून आज रविवार असल्याने मंडळ अधिकारी तलाठी व ग्रामसेवक हे खाजगी कामानिमित्त बाहेरगावी असल्याने नुकसानीचा पंचनामा होऊ न शकल्याने अधिकृत नुकसानाची माहिती मिळू शकली नाही.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:13 am, January 15, 2025
temperature icon 30°C
टूटे हुए बादल
Humidity 32 %
Wind 23 Km/h
Wind Gust: 27 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:09 pm
Translate »
error: Content is protected !!