नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मसाज सेंटरच्या नावाखाली चालायचा वेश्याव्यवसाय; पुणे पोलिसांचा छापा, व्यवस्थापकाला अटक

DPT News Reporter (दत्तात्रय माने):  पुण्यातील  विमाननगर भागात मसाज सेंटरच्या  नावाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी मसाज सेंटरचा व्यवस्थापक 19 वर्षीय इमदादुल्ला इस्माईल अली याला अटक करण्यात आली आहे. मसाज सेंटरचे मालक शंतनू सरकार, शमशुद्दीन आणि जयराम वालपुली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमाननगर येथील गल्ली क्रमांक तीनवरील अमेय स्पा नावाच्या बंगल्यात वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांना आढळून आले, त्यानंतर त्यांनी छापा टाकला आहे.

‘जस्ट डायल’वर उपलब्ध होती माहिती

‘जस्ट डायल’वर विमाननगर परिसरातील मसाज पार्लरबाबत  माहिती उपलब्ध होती.स्पा सेंटरमधील कामगारांकडून संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला जात होता. त्यानंतर त्याला ग्राहक बनवून मसाजच्या नावाखाली जास्तीचे पैसे उकळल्या जात होते. जास्त पैसे उकळून वेश्याव्यवसाय केला जात होता, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आली आहे.

पोलिसांनी रचला सापळा
स्पा सेटरच्या नावाखाली नावाखाली वेश्याव्यसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कारवाई करण्यासाठी सापळा रचला. पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक म्हणून संपर्क केला. त्यानंतर सगळं प्रकरण बाहेर आलं. पोलिसांनी रचलेल्या सापळ्याच्या माध्यमातून स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला. 

मसाज सेंटरचा व्यवस्थापक इमदादुल्ला अली याला ताब्यात घेण्यात आले. कारवाईत तीन तरुणांना अटक करण्यात आली असून नऊ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.आरोपीविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पांढरकर, मोहिते, अश्विनी केकाण, हनुमंत कांबळे, अण्णा माने आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:49 am, July 20, 2025
temperature icon 26°C
छितरे हुए बादल
Humidity 71 %
Wind 6 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 6:00 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!