नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रत्नागिरी शहरात तरुणावर तलवारीने सपासप वार केले

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर रिक्षा स्टँडजवळ जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. धारदार तलवारीने तरुणावर सपासप तीन वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुण राजेंद्र विटकर हा तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या हातावर आणि पायावर गंभीर वार झाले आहेत. हल्ला झाल्याच्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला असून या हल्ल्यातून संबंधित तरुण थोडक्यात बचावला आहे. या गंभीर हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या तरुणाला कोल्हापूर येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

भर गजबजलेल्या क्रांती नगर येथे एका वर दोघांनी मोटरसायकल वरून येऊन उजवा हातावर वार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वार करून लाल शर्ट व पांढऱ्या शर्ट वाले मोटरसायकल वरून सुसाट निघून गेले आहेत. रत्नागिरी सारख्या शांत भागात वार केल्याची घटना घडली आहे. आज सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मारणाऱ्या मधील एक जण हा एम आय डी सी परिसरातील असल्याचे समजते तर दुसरा हा त्याचा मित्र आहे.

कोकण नगर येथील कोपऱ्यावर असलेल्या दारूच्या दुकानात आधी त्याची बाचाबाची झाली होती पण वार का केले गेले ? याबाबत मात्र कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. दरम्यान या सगळ्याची गंभीर दखल रत्नागिरी पोलिसांनी घेतली असून तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:59 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!