नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आपले आरोग्य हीच खरी धनदौलत आहे

आपले आरोग्य हीच खरी धनदौलत आहे

” संकल्प नियमित योगा
करण्याचा आजपासून
जपा मंत्र निरोगी व
सुखी आयुष्य जगण्याचा ”


योग हा शब्द संस्कृत भाषेतील यूज या शब्दावरून आलेला आहे. याचा अर्थ देवाबरोबर आत्म्यास जोडणे होय. योग ही एक आध्यात्मिक शिस्त असून संपूर्ण जीवनाचा सार यात आत्मसात केलेला आहे. शरीर आणि मनावर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग योग साधनेतून मिळतो. आपले शरीर आणि मन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण आपले शरीर जे कार्य करते त्याचा परिणाम मनावर होतो आणि मन जे विचार करते त्याचा परिणाम शरीरावर होतो. आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून योगाचे महत्व समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न समर्पकपणे कलाकारांने केलेला आहे. योगसाधना मानवात उत्साह, उर्जा, नवचेतना, सृजनशीलता, एकाग्रता, शांतता, समाधान, आनंद या अनमोल व अमूल्य गुणांचा विकास करते.
मानवाचे हृदय आणि आत्मा यांच्यात सामंजस्य निर्माण करण्यासाठी योगाचा विकास झाला आहे. भारतीय तत्त्वज्ञ पतंजली यांनी योग तत्वज्ञानावर लिहिलेला 2000 वर्ष जुना ‘योगसूत्र’ हा ग्रंथ मनावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आजही मार्गदर्शक मानला जातो. भारतात 21 जून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा करतात. मनुष्याला निरोगी आणि दीर्घायुषी होण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. योग साधनेतून मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यातून आपल्याला येणारा मानसिक तणाव, चिंता, मनोविकृती दूर होतात. नियमित व्यायामाने शरीर सुदृढ आणि कणखर बनते. व्यक्तीची वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वृद्धिंगत होते. या सर्व बाबी बद्दल जाणीव जागृती या चित्रमय विश्वातून समर्पकपणे कलाकाराने केलेली आहे.
योगाचे विविध प्रकार आहेत त्यात राजयोग, ज्ञानयोग,कर्मयोग, भक्तियोग, लययोग,हटयोग यांचे वैविध्यरुपी फायदे मानवाला होतात. योगाचा खरा उद्देश मन, शरीर आणि वातावरणात सुसंवाद निर्माण करणे होय. योग करण्याचे काही विशेष नियम नाही आहे. योगा हा सकाळी शांततापूर्ण वातावरणात करावा त्यात सातत्य आणि एकाग्रता असावे. आजच्या धावपळीच्या जीवनात व्यक्तीला सर्व करायला वेळ आहे पण स्वतःसाठी वेळ नाही. त्याचे वाईट परिणाम म्हणजे सरासरी आयुष्यमान कमी होत जात आहे. दररोज प्रत्येकाने योगा केला पाहिजे असा संबोधात्मक संदेश कलाकाराने अर्थ पूर्णपणे व्यक्त केला आहे.
आजच्या काळात बदललेली जीवनशैली, प्रसार माध्यमांचा अतिरिक्त वापर,गरजेपेक्षा जास्त सोयी सुविधांची उपलब्धता यामुळे कमीत कमी कष्टात जास्त कसे मिळवता येईल ही तरुण पिढीची मानसिकता झाली आहे. ही चूकीची विचारसरणी बदलण्याच्या दृष्टिकोनातून समाज जागृतीच्या उद्देशाने कलाकाराने हे चित्र अभिव्यक्त केले आहे. काळाच्या ओघात गतिमान समाजाने मागे वळून पाहिले पाहिजे. आपल्या पूर्वीच्या लोकांच्या सवयी स्वतःमध्ये रुजवून घेतल्या पाहिजे. मी किती पैसा कमावणार आहे यापेक्षा जास्त शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त मी कसा राहील याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज न मिळालेली गोष्ट आपण पुन्हा मिळवू शकतो पण शरीर आणि मनाचे झालेले नुकसान भरून काढणे खूप कठीण आहे.
” तुम्ही स्वतः बदला मग जग
बदलेल प्रत्येक दिवशी योगासना
दीर्घायुषी व आनंददायी ठरेल ”

चित्र सौजन्य-श्री.यशवंत निकवाडे,शिरपूर
चित्र भावार्थ सौजन्य-प्रा. डॉ.ज्योती रामोड पुणे

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:36 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!