नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बातमी छापली म्हणून पत्रकाराला शिवीगाळ व मारण्याची धमकी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल



रायगड प्रतिनिधी : दिप्ती पाटील


रायगड : कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत भिसेगाव फातिमा नगर येथील राहणारी व गुन्हेगारी प्रवृत्तीची महिला बायमा उर्फ राखी विश्वनाथ शेट्टी हि अनेक दिवसांपासून बेकायदेशीर अवैध धंदे करीत होती याप्रकरणी कर्जत पोलीसांनी तीच्या घरावर छापा टाकून गांजा अंमली पदार्थ जप्त करून आरोपीला अटक केली याबाबतची बातमी पत्रकार जयेश जाधव यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध केली या गोष्टीचा पुर्वग्रह राग मनात धरुन तुरुंगातून जामीनावर सुटलेली आरोपी महिलेने गैरकायद्याची अवैध धंदे करणारे महिलांना सोबत घेऊन पत्रकार जाधव यांच्या घराच्या आवारात येऊन त्याना त्यांच्या पत्नीला मोठमोठ्याने आरडाओरड करीत मोठमोठ्याने अश्लील भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली याबाबतची घटनेची त्वरित माहिती पत्रकार जाधव यांनी कर्जत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.डी कोल्हे यांना मोबाइलद्वारे दिली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसांना पाठवले आणि लगेच आरोपींना ताब्यात घेऊन कर्जत पोलिस ठाण्यात आणले.याबाबत जयेश जाधव यांनी कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दिलेल्या तक्रारीवरून कर्जत पोलिस ठाण्यात आरोपी बायमा उर्फ राखी विश्वनाथ शेट्टी, सारिका शेट्टी,सिमा लक्ष्मण जाधव विरोधात भा.द.वि कलम५०४,५०६,३४अन्वये गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक फौजदार संजय जगताप करीत आहे.
आरोपी महिला बायमा उर्फ राखी विश्वनाथ शेट्टी विरोधात कर्जत पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवर विविध स्वरूपाचे दखलपात्र गंभीर गुन्हे दाखल आहेत नुकताच तीची एक महिन्यानंतर गांजा प्रकरणातील गुन्ह्यांत अटक झाल्यानंतर जामिनावर सुटका झाली आहे.
कर्जत पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील महिला आरोपी हिच्या विरोधात कर्जत पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा अहवाल बनवून गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग येथे सी आर पी सी ११०(ई)(ग)प्रमाणे कारवाईसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक के.डी.कोल्हे यांनी दिली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:12 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!