नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हादरवणारं हत्याकांड! ‘त्या’ तिघींची एकाच इसमाकडून हत्या; धक्कादायक कारण समोर

DPT NEWS Network जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव येथील तीन महिलांचा वेगवेगळ्या घटनेत रुमालाने गळा आवळून खून करून गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्ह्यातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून संशयिताने तीनही गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मुकुंदा ऊर्फ बाळू बाबूलाल लोहार (वय-30 रा. चौधरीवाडा, किनगाव ता. यावल) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 
यावल तालुक्यातील किनगाव येथील राहणाऱ्या 70 वर्षीय वृध्द महिला मराबाई सखाराम कोळी या घरी एकट्या असताना (२३ मे)आरोपीने रुमालाने गळा आवळून हत्या केली. नंतर महिलेच्या अंगावरील चांदीचे दागिने चोरले.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर मुकुंदाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आणखी धक्कादायक गुन्ह्याची कबुली दिली. त्याने किनगावातीलच द्वारकाबाई चैत्राम सुरवाडे (वय-७०), रूख्माबाई कडू पाटील (वय-७०) या दोन वृध्द महिलांचा देखील याच पध्दतीने गळ्यात रूमाल आवळून खून केला होता आणि दोघांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून पसार झाला होता.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:29 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!