नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पुण्यात झाड कोसळून २ जण जखमी तर ४ वाहनांचे नुकसान

प्रतिनिधी- दत्तात्रय माने

DPT News Network पुणे : सध्या सूरू असलेल्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे झाडं कोसळण्याच्या घटना घडत असतात. यातच, आता पुण्यातील एसपी रोड जवळील एक भलं मोठं लिंबाचं झाड अचानक पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. या दुर्घटनेत २ ते ३ जण जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात २ दुचाकी, टेम्पो आणि रिक्षाचे मोठे नुकसान झालं आहे.
पुण्यातील बालभारती चौकात काही वेळापूर्वी एक भलं मोठं झाड कोसळल्याची घटना घडली आहे, पुण्यातील सेनापती बापट रोड आणि लॉ कॉलेज रोडला जोडणारा हा मुख्य चौक असून या रस्त्यावर कायम रहदारी असते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

पुण्यातील बी एम सी सी कॉलेजकडून एस बी रोड ला जाताना जर्मन बेकरी जवळील एक भव्य झाड कोसळलं आहे. घटना घडल्यानंतर तातडीने फायर ब्रिगेडचं पाचारण करण्यात आलं. त्यानंतर फायर ब्रिगेडकडून मदतकार्य सुरू आहे. घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:00 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!