नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पुणे पोलिसांचं ‘कॉम्बिंग ऑपरेशन’; साडेतीन हजार गुंडांची केली झाडाझडती, त्यानंतर…

प्रतिनिधी (दत्तात्रय माने) पुणे : पुणे पोलिसांनी शहरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवत साडे तीन हजार गुन्हेगारांची झाडाझडती घेतली आहे. या कारवाईत साडेतीन हजारांपैकी ६८५ गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यातही आले आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी दोन पिस्तुल, काडतुसे, शस्त्रसाठा जप्त केला आहे. तसेच चंदननगरमधील हुक्का पार्लरवरही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अचानक केलेल्या या कॉम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

शहरात लुटमार, घरफोड्या, वाहनांच्या चोऱ्या आणि हाणामारीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी पुणे पोलीसांकडून हे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. पुणे पोलिसांनी ही मोहीम शनिवारी रात्री अचानक राबवली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी सीआरपीसी कायद्याप्रमाणे ८० आरोपींविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी १४ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. तसेच शहरातील ३९१ हॉटेल्स, ढाबे, लॉजेस तसेच एसटी स्टँड,रेल्वे स्थानकांची पोलिसांनी तपासणी केली आहे. ७०३ वाहने तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. दरम्यान, वाहतूक विभागाने ४९२ संशयित वाहनचालकांची तपासणी करुन २७६ दुचाकींवर, १९ तीन चाकी व १९७ चारचाकींवर कारवाई केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:31 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!