नाशिक: पत्नीसोबत असलेल्या विवाहबाह्य संबंधाच्या रागातून पतीने आपल्या नातेवाइकाच्या मदतीने आगरटाकळी येथे एका तरुणाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. हा तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर आडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात काळूराम उर्फ कैलास मिणा (लोखंडे चाळ, उपनगर, मूळ रा. राजस्थान) व रामलाल मिणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. जखमी इरफान हुबे शेख (२४, आढाव मळा, जेलरोड, मूळ रा. उत्तर प्रदेश) याचे एका विवाहितेशी अनैतिक संबंध होते. त्यावरून महिलेचा पती कैलास मिणा याने रामलाल मिणा याच्या मदतीने इरफानच्या गळ्यावर वार केले.



