नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पुण्यात १७ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या; आरोपींचा पोलीस शोध सुरू

DPT News Network पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. थेऊर येथील एका मोकळ्या जागेत हा मृतदेह सापडला. थेऊर पोलीस चौकीपासून काही अंतरावर हा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे काही नागरिकांना थेऊर पोलीस चौकीपासून काही अंतरावर असणाऱ्या मोकळ्या जागेत एका मुलीचा मृतदेह आढळला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांनतर घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांसोबतच डॉग स्कॉड देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस सदर घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, मृत तरुणी ही अंदाजे १७ वयोगटातील आहे. अज्ञात आरोपींनी अतिशय मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याची दिसत आहे. मृत तरुणीच्या चेहऱ्यावर दगडाने वार केल्याच्या देखील खुणा दिसत आहेत. या तरुणीवर अत्याचार झालेत का ? याची शंका उपस्थित केली जात आहे. पोलीस या तरुणीची ओळख प्रयत्न करत आहे. मात्र, तरुणीच्या हत्येनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा “आ” वासून उभा आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:27 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!