नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पुण्यात हायप्रोफाइल मैत्रीची लालच पडली महागात, सायबर चोरट्याने १८ लाखांना घातला गंडा

हायप्रोफाइल तरुणींशी मैत्रीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी १८ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत सायबर चोरट्यांवर माहिती-तंत्रज्ञान कायदा; तसेच फसवणुकीच्या कलमांनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

DPT News Network पुणे: पुण्यात ४४ वर्षाच्या व्यक्तीने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून तक्रारदाराशी संपर्क साधून आमिष दाखविण्यात आले. फिर्यादी खासगी कंपनीत अधिकारी पदावर आहेत. दोन महिन्यांपूर्वी मोबाइलवर रिना नावाच्या महिलेने संपर्क साधला. एका वेबसाइटच्या माध्यमातून उच्चभ्रू तरुणींशी मैत्री घडवून आणली जाते. त्यासाठी नावनोंदणी करावी लागेल, प्रोफाइल अपडेट करावे लागेल, अशी बतावणीकरून तिने तक्रारदारांकडून १८ लाख ३७ हजार ६०० रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदाराने त्या महिलेकडे विचारणा केली असता, तिने पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेतली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:27 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!