प्रतिनिधी: हरिश्चंद्र महाडिक
=========================
सुतारवाडी : – रोहा तालुक्यात गळफास घेवून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसें दिवस वाढतच चालले असून आता पुन्हा एकदा बबलूप्रसाद चंद्रवंशी याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी रोहा तालुक्यातील नागोठणे येथील गवळ आली भागात बबलूप्रसाद रामेश्वरप्रसाद चंद्रवंशी वय वर्षे ४५ हा एका कंपनी मध्ये कंत्राटी कामगार आहे. तो मूळचा खुसरूपूर, जि . फटका , बिहार येथील आहे. त्याने बाथरूम मधील दांडीला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. बाथरूम मध्ये गेलेला बबलूप्रसाद बराच वेळ होऊनही बाहेर आला नाही म्हणून पत्नीने बाथरुमच्या फटीतून आतमध्ये पाहिले असता पतीने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याच्या मुलाने दरवाजा तोडून बबलूप्रसादला बाथरूमच्या बाहेर काढले असता तो पूर्णपणे थंड पडलेला आढळला. मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने आत्महत्या केली असावी असे बोलले जाते. सदरील घटनेची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात केली असून नागाठणे पोलिस अधिक तपास करत आहेत.



