नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

एरंडोल तालुका शिवसेने तर्फे बेताल वक्तव्य केल्या संदर्भात रामदास कदम यांच्या निषेधार्थ पुतळा दहन व “रास्ता रोको” आंदोलन

प्रतिनिधी – उमेश महाजन

एरंडोल – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व ठाकरे परिवार यांच्या विषयी बेताल वक्तव्य व चुकीचे आरोप केल्याप्रकरणी रामदास कदम यांचे पुतळा दहन व रास्ता रोको आंदोलन २१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धरणगाव हायवे चौफुलीवर करण्यात आले जवळपास ३० मिनिटे पर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला थांबलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष रमेश महाजन शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले हिम्मत पाटील जिल्हा परिषद चे माजी सदस्य नानाभाऊ महाजन पारोळा तालुका प्रमुख प्राध्यापक आर बी पाटील युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विवेक पाटील शहरप्रमुख कुणाल महाजन पारोळा शहर प्रमुख अशोक मराठे तालुका समन्वय कमलेश पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील अतुल महाजन सुनील चौधरी संजय महाजन रुपेश माळी दशरथ चौधरी राजेंद्र ठाकूर प्रमोद महाजन रेवानंद ठाकूर सुनील मराठे गोपाल देशमुख परेश बिर्ला गजानन महाजन अमोल भावसार कुणाल पाटील गोपाल महाजन महेश महाजन प्रदीप राजपूत आरिफ मिस्तरी नासिर शेख अमोल भोई दिनेश राठोड भारत चौधरी गुड्डू चौधरी रतन पाटील धनराज अहिरे ज्ञानेश्वर बडगुजर पंकज चौधरी बाळू सोनार अशोक बडगुजर भिकन बैरागी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्या ठाकरे परिवाराच्या आशीर्वादाने गेल्या पन्नास वर्षात ज्यांनी पदे उपभोगली तेच आता गद्दारी करून पक्ष नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका करीत आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे व शिवसेना या अक्षरांच्या पुण्याइने लायकी नसताना मंत्रिपदापर्यंत पोहोचून ज्यांनी सत्तेची फळे चाखली आपल्या वारसदारांना राजकारणात लाभाची पदे मिळवून दिली आज तेच गद्दार कमावलेल्या बेकायदेशीर संपत्तीमुळे ईडीच्या भीतीने पक्ष नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेले त्यांना पक्षप्रमुखांवर बोलण्याचे नैतिकता तरी आहे का? अशी घणाघाती टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर हर्षल माने यांनी यावेळी केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:40 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!