DPT NEWS – प्रतिनिधी – अकिल शहा
धुळे : साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस नाइक ईलाताई गावित यांच्या कार्याला सलाम, त्यांच्या कार्याबद्दल महात्मा फुले बहुउद्देश्यीय संस्था संचलित यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल, नेर यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
खकीच्या धाकाची,अथवा तो ओसरल्याची बाब नेहमी चर्चेत येते किंवा टिका टिप्पणीही ठरते, परंतु या ‘खाकी’तही असलेल्या माणुसकीचा जेव्हा दर्शन घडते तेव्हा सलाम केल्याखेरिज राहवत नाही अशा साक्री पोलीस ठाण्यातील महिला पोलीस नाइक ईलाताई गावित यांना मानाचा सलाम
सविस्तर वृत- नांदवन ता.नवापुर जि.नंदुरबार येथील रहिवासी व साक्री पोलीस ठाण्यात (पोलीस नाइक) पदावर कार्यरत असलेल्या ईलाताई गावित या आपल्या पती सोबत नवापुर वरुन धुळयाकड़े जात असताना विसरवाडीच्या गावाच्या पूर्वेला 10 कि.मी. अंतरावर असलेल्या सोनखांब गावाच्या एका हॉटेल जवळ वळण रस्त्यावर मागून येणा-या ट्रक ने धुळे येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार बंसीलाल पगारे हे त्यांच्या परिवारासह एका खाजगी वाहनाने सूरतहून धुळयाकड़े जात असतांना त्यांच्या कारला ट्रकने धड़क दिली या वेळी अनेक वाहनधारकांनी फक्त बघ्याची भूमिका घेत होते त्यावेळी ईलाताई गावित यांनी आपल्या पतीला गाड़ीथांबविण्याची विनंती करुण देवदूत सारख्या धावून गेल्या, त्यांनी तात्काळ गाडीवरुन खाली उतरून अपघातामध्ये जखमी झालेल्यांना वाचविण्यासाठी धाव घेवून कारचे दरवाजे उघडले त्यावेळी कार मधील पगारे दाम्पत्य घाबरलेल्या अवस्थेत होते त्यांनी तात्काळ या घटनेबाबत विसरवाडी पोलीस स्टेशनला फोन करुण माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळी येवून जखमी झालेल्या पगारे कुटुंबाला उपचारासाठी विसरवाडी येथे नेले त्यांच्या या कार्याबद्दल महात्मा फुले बहुउद्देश्यीय संस्था संचलित यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल, नेर येथे त्यांचा व त्यांच्या पतीचा ही सत्कार करुण सन्मान करण्यात आला अशा या रणरागिणी महिला पोलीस नाइक ईलाताई गावित यांना पुनच्च सलाम.



