प्रतिनिधी – तोहिद मुल्ला
DPT NEWS NETWORK
सांगली :- कवठेमहंकाळ तालुक्यातील दंडोबा परिसरात 20 लाख रुपये रकमेचे दडवून ठेवलेले हस्तिदंत कवठेमहंकाळ पोलिसांनी छापा टाकून पकडले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. राहूल भिमराव रायकर (वय 28 रा.संकपाळ गल्ली,कसबा बावडा, कोल्हापूर), बालाजी हरिश्चंद्र बनसोडे (वय 30, विजयनगर, कोल्हापूर), कासिम शमशुद्दीन काझी (वय 20,रा.खाजा वस्ती,मिरज) व हणमंत लक्ष्मण वाघमोडे ( वय 39, रा.लोणारवाडी ता. कवठे महांकाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.अधिक माहिती अशी की, पोलिस नाईक चंद्रसिंग साबळे यांना खास बातमी दाराकडून हस्तिदंताची खरेदी विक्री बाबत माहिती मिळाली होती. डी.बी. पथकाचे प्रमुख अमिरशा फकीर हे सर्व बाबीवर नजर ठेवून होते. खरशिंग गावानजिक दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी छापा टाकून आरोपीना मुद्देमाल मालासह पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. सोमवारी पहाटे अडीच ते 3 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलीसांनी या चार आरोपीकडून 20 लाख रुपयांचे दोन हस्तिदंत, 40 हजार रूपयांच्या दोन मोटरसायकली असा एकूण 20 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील चौघांना अटक करण्यात आली असली तरी आणखी दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम,अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबूले,विभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, डी.बी.पथकाचे अमिरशा फकीर, पोलीस नाईक चंद्रसिंग साबळे, पोलीस फौजदार विजय घोलप, हवालदार केरबा चव्हाण,पोलीस काॅनस्टेबल सिद्धेश्वर कुंभार यांनी केली आहे. पुढील तपास डी.बी.पथकाचे प्रमुख अमिरशा फकीर करीत आहेत.



