प्रतिनीधी – मनोहर गोरगल्ले
DPT NEWS Network
पुणे : जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी रिक्षा चालकाची हत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील चाकण येथे घडली असून हर्षद काकर अशी हत्या झालेल्या रिक्षा चालकाचे नाव असून या प्रकरणी मयत तरुणाच्या भावाच्या तक्रारीनुसार चाकण पोलीस ठाण्यात नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणव उर्फ पन्या संजय शिंदे, साहिल दत्ता शिंदे, आनंदा उर्फ अण्णा तांडव, हनुमंत कोरम शेट्टी, निशान देवेंद्र बोगाती, अतुल अर्जुन तांबे, रितेश परमेश्वर घोडके, यश अनिल जगताप, कुलदीप जोगदंड, कृष्णा सुनील भंडवलकर, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असुन आरोपी पैकी एकाने रिक्षाला हात दाखवला आणि वाकी कडे जाऊन पुन्हा यायचे आहे असे सांगितले आणि रिक्षा वाकीच्या दिशेने घेऊन निघाला. रिक्षा चाकण येथील बैलगाडा घाटाजवळ येताच त्या ठिकाणी आधी दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. अचानक झालेल्या हल्याने युसुफ घाबरून रिक्षा सोडून पळू लागला. मात्र डोळ्यात मिरची पावडर पडल्याने त्याला पुढे काही दिसत नसल्याने. तो जास्त पळू शकला नाही त्याचा फायदा घेत हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर जेवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात युसुफचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळावरून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि लाल मिरची पावडर जप्त केली आहे. पूर्व वैमनस्यातून या तरुणाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेने चाकण परिसरात खळबळ माजली आहे. चाकण परिसरात दिवसेंदिवस खुणाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक गुन्हे चाकण परिसरात घडत असल्याने ही गुन्हेगारीचे मोठे आव्हान चाकण पोलीसांपुढे उभे आहे. घटना हि गंभीर स्वरूपाचे असल्याने चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी तात्काळ सदर प्रकार पोलीस आयुक्त अंकुश शिंदे अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे पोलीस उपायुक्त मंचक पेपर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणाकडे यांना कळविली त्यानंतर वरिष्ठ अधिकारी त्यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल देवरे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ -१ मंचक अप्पर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे मॕडम यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे तपास करीत आहेत.



