नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पुणे ; गुंड गज्या मारणेला आश्रय देणाऱ्यांवर ‘मोक्का’ कारवाई ; पोलीस आयुक्तांचा इशारा

DPT NEWS NETWORK पुणे : शेअर दलालाचे २० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात कोथरुडमधील गुंड गजानन उर्फ गज्या मारणे पसार झाला असून त्याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेकडून पथके तयार करण्यात आली आहेत. मारणेला आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

गज्या मारणे याच्यासह १४ जणांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाईचे आदेश मंगळवारी रात्री दिले. त्यानुसार गजानन उर्फ गज्या पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), हेमंत उर्फ अण्णा बालाजी पाटील (वय ३९, रा. बुरली, ता. पलूस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६), फिरोज महमंद शेख (वय ५०, दोघे रा. कोडोवली, जि. सातारा), रुपेश कृष्णराव मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दापोडी), अजय गोळे (रा. नऱ्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, पद्मावती), नवघणे यांच्यासह साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. शेअर दलालाचे अपहरण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात चौघांना अटक करण्यात आली आहे. गज्या मारणे आणि साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. मारणेला आश्रय देणारे, त्याला आर्थिक मदत करणारे आढळून आल्यास त्यांच्यावरही मोक्का कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:39 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!