नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ची कामगिरी महाळुंगे एमआयडीसी चौकी हद्दीतील दुहेरी खुनातील आरोपीस केले ३६ तासाच्या आत गजाआड

प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
राजगुरुनगर : -महाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीतील सावरदरी मध्ये भक्ती अपारमेंट येथे सुरत चव्हाण व अनिकेत पवार यांचा आपापसातील वादातून प्रदीप दिलीप भगत याने चाकूच्या साह्याने भोसकून खून करून त्याचे कडील होंडा शाईन मोटरसायकल वरून पलायन केले असल्याचे महाळुंगे चौकी गु.र.न.१५९२/२०२२ भा.द.वि.क.३०२अर्म अॕक्ट ४,२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाकण औद्योगिक परिसरात झालेला दुहेरी खुण गंभीर स्वरूपाचा असल्याने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ३ मधील व पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अधिकारी, पोलीस आमलदार यांच्या तपासासाठी वेगवेगळ्या टीम तयार करून. एक टीम घटनास्थळावरील परिसर, सदर आरोपीचे संपर्क असणारे नातेवाईक, मित्रांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे रात्रभर कसुन चौकशी केली असता सदर आरोपी त्याचे मूळ गावी गेला असल्याबाबत माहिती मिळाली. सदरची माहिती वाशिम येथे आरोपीच्या शोधासाठी गेलेल्या टीमला देण्यात आली. वाशिम येथे पाठविण्यात आलेल्या टीम मधील पोलीस हवालदार आढारी, पोलीस नाईक भोसुरे, पोलीस नाईक भालचिम, पोलीस शिपाई सूर्यवंशी यांनी सलग १२ तास प्रवास करून ६०० किलोमीटर अंतरावरील वाशिम येथे आरोपीचे मूळ गाव गिंभा तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथे जाऊन आरोपीचा भाऊ निलेश दिलीप भगत वय २२ वर्षे यांस राहाते घरातुन व आरोपीचा मामेभाऊ रोशन सुरेश इंगवले वय २३ वर्षे राहणार रुई तालुका मानोर जिल्हा वाशिम यांना ताब्यात घेतले व त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या कडे प्रदीप भगत बाबत माहिती विचारली असता तो त्याचे मामाचे गावी रुई तालुका मानोर जिल्हा वाशिम येथे राजु वसंत इंगवले यांच्या शेतात लपून बसला असले बाबत सांगितले. सदर पथकाने त्याचा स्थानिक पोलिसांचे मदतीने जंगल परिसरात रात्रभर शोध घेऊन आरोपी प्रदीप दिलीप भगत वय २१ वर्ष राहणार सावरदरी शिवम पार्क रूम नंबर २४ तिसरा मजला, तालुका खेड, जिल्हा पुणे, मुळ राहणार गिंभा, तालुका मंगरूळपीर, जिल्हा वाशिम, यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता सदरचा गुन्हा सुरज चव्हाण व अनिकेत पवार यांनी त्यांचे बिल्डिंगमध्ये येण्यास विरोध केल्याच्या कारणावरून खून केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीस चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत महाळुंगे पोलीसचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय शिंदे, मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉक्टर प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले यदु आढारी, सचिन मोरे, ऋषिकेश भोसले, अंकुश लांडे, महेश भालचिंग, सागर जनक, योगेश्वर कोळेकर, राजकुमार हनुमंते, त्रिनयन बाळसराफ, राहुल सूर्यवंशी रामदास मेरगळ, सुधीर दांगट, समीर काळे, निखिल फापाळे, यांनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:59 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!