*नंदुरबार – रविंद्र गवळे*
नंदुरबार गांजाची शेती करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई , 3 लाख 52 हजार रुपये किमंतीचा 50 किलो गांजा जप्त नंदुरबार जिल्ह्यात कोणत्याही अंमली पदार्थाचा प्रसार होवू नये म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे खुप संवेदनशील असून गांजा , अफु इत्यादी प्रकारचे अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक , लागवड करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री . पी . आर . पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते . त्यामुळे जिल्ह्याचे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा हे अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक व लागवड यांचेवर कारवाई करणेसाठी त्याबाबतची माहिती घेत होते . दिनांक 16/10/2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री . पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील फेस – बामखेडा गाव शिवारात एका इसमाने त्याचे कपाशीचे पिकाचे शेतात बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केली असल्याची खात्रीशिर बातमी सांगितली . नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री . पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले . स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ व त्यांचे अमंलदार हे मिळालेल्या गोपनीय बातमीच्या ठिकाणी फेस – बामखेडा गावाचे शिवारात कापसाचे पीक असलेल्या शेतांकडे पायी गेले असता सदर बातमीमधील संशयीत एका कापसाचे पिकाचे शेतात हालचाली करत असल्याचे दिसून आले , पोलीसांचे पथक त्याच्या दिशेने येत असल्याचे समजताच त्याने तेथुन पळ काढला . स्थानिक गुन्हे शाखा व सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदारांनी त्यास पाठलाग करुन जंगलात पळुन जाणाऱ्या इसमाला पकडण्यात यश आले . पकडलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राकेश हिरालाल शिरसाठ वय 32 वर्षे राहणार बामखेडा ता . शहादा जि . नंदुरबार असे सांगितले , पोलीसांनी कापसाच्या शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिकठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसुन आले , म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपुर्ण शेती पिंजून काढली असता तेथे 50 किलो 315 ग्रॅम वजनाचे 3 लाख 52 हजार 205 रुपये किंमतीची एकुण 25 गांजाची झाडे मिळुन आल्याने गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतला . तसेच आरोपी नामे राकेश हिरालाल शिरसाठ वय 32 वर्षे राहणार- बामखेडा ता . शहादा जि . नंदुरबार याचेविरुध्द् सारंगखेडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 187/2022 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 ( क ) , 20 ( ब ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .. सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री . पी . आर . पाटील , शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री . श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर , सपोनि श्री . संदीप पाटील सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री . राजेश शिरसाठ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक दादाभाई मासुळ , विकास कापुरे , पोलीस अमंलदार किरण मोरे , राजेंद्र काटके फॉरेन्सीक टीमचे पोलीस अंमलदार दिनेश लाडकर , संजय रामोळे , चेतन चौधरी , सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शानाभाऊ ठाकरे , विजय गावीत यांचे पथकाने केली असुन मा . पोलीस अधीक्षक , नंदुरबार श्री . पी . आर . पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे .
*पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे आवाहन*
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री . पी . आर . पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की , तंबाखूजन्य व अमंली पदार्थांचे सेवन केल्याने स्वास्थ्यावर दुष्परिणाम होवून विविध प्रकारचे आजार होतात . तसेच अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक , सामाजिक हानी | होवून त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबीयावर होत असतो . तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब | राहावे असे आवाहन केले . ( पी . आर . पाटील भा.पो.से. ) पोलीस अधीक्षक , नंदुरबार