नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शिरपूर तालुका सपोनि सुरेश शिरसाठ यांची धडक कारवाई: बेघर वस्तीतील बनावट दारूचा कारखाना केला उद्ध्वस्त, दीड लाखांचा मुद्येमाल जप्त

प्रतिनिधी – कैलास माळी

धुळे : शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील बेघर वस्तीतील एका घरात सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर तालुका पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. तेथून दीड लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. संशीयत आरोपी पसार झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोराडी गावातील पेट्रोल पंपा समोर असलेल्या बेघर वस्तीतील राजेश विश्वास पावरा हा त्याच्या घरात लोकांचे आरोग्यास अपायकारक होईल, अशी बनावट दारु विक्री करण्याच्या उद्देशाने तयार करीत आहे. अशी खात्रीशीर माहिती काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली.

त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईसाठी रवाना केले. पथक बोराडी गावातील पेट्रोलपंप समोरुन पायी बेघर वस्तीकडे जात असतांना एक बेघरातुन एक इसम पळतांना दिसल्याने त्यास पथकाने आवाज देत थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो गल्ली बोळातुन अंधाराचा पळुन गेला. त्यानंतर तो ज्या घरातुन पळाला त्या बेघरात छापा टाकुन तपासणी करण्यात आली. तेव्हा दरवाज्यालगत तसेच किचन रुममध्ये देशी दारुच्या बाटल्या व दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिसून आले.

तेथून 1 लाख 34 हजार 400 रुपये किंमतीच्या टँगोपंच असे लेबल असलेल्या 1 हजार 920 काचेच्या सिलबंद बाटल्या, 10 हजारांचे बुच पॅक करण्याचे एक लोखंडी मशीन व त्या खाली बाटली ठेवण्यासाठी स्टँड व 720 रूपये किंममीचे दोन प्लॉस्टीक ड्रम, एक नरसाळे, 70 लीटर स्पिरीट त्यात काचेचे अल्कोहोल मीटर, पांढर्‍या रंगाचे माप, बारीक नळी प्लॉस्टीकची बादली असा एकुण 1 लाख 52 हजार 120 रुपये किंमतींचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

पोहेकॉ जाकिरोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरुन संशयीतावर भादंवि कलम 328, 468, 486, 488, 420 सह महा. दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई भिकाजी पाटील करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:32 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!