नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धक्कादायक : महिला पोलिसाची आत्महत्या

प्रतिनिधी – रशीद सैय्यद

नाशिक – संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील खोकराळे वस्ती या ठिकाणी एका पोलीस महिलेने माहेरी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. लता गोरख खोकराळे (वय 29 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे. मंगळवार दि. 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस महिलेच्या आत्महत्येच्या या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

लता गोरख खोकराळे (वय 29 वर्षे) ही विवाहित महिला शिर्डी पोलीस ठाण्यास नियुक्तीस होती. मात्र, सध्या ती रजेवर होती आणि तळेगाव दिघे येथे माहेरी आई-वडिलांकडे राहत होती. दरम्यान मंगळवारी (दि. 18) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरात कुणीही नव्हते. पोलीस असलेल्या लता खोकराळे हिने पत्र्याच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. आई – वडील गावातून सायंकाळी घरी आल्यावर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर लता खोकराळे हिला तातडीने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी गोरख बाबुराव खोकराळे (वय 65 वर्षे, रा. तळेगाव दिघे) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील तसेच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तळेगाव दिघे (खोकराळे वस्ती) याठिकाणी शोकाकुल वातावरण मयत लता खोकराळे हिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:06 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!