प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: पोलीस मुख्यालय , नंदुरबार येथील मैदानावर 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेला दि. 31 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली .
सदर स्पर्धा दि. 31ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर रोजी पावेतो खेळविल्या जाणार आहेत .
यावेळी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , पोलीस उप अधीक्षक ( मुख्यालय ) विश्वास वळवी , आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान , शहादा उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे , अक्कलकुवा उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांचेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस खेळाडू उपस्थित होते .
जनतेची सुरक्षा हे पोलीसांचे कर्तव्य असून त्यासाठी पोलीस दिवस रात्र मेहनत करून आपले कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडत असतात .
परंतु रात्र गस्त , गुन्ह्याचे तपासकामी बाहेर गावी , बंदोबस्त , कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त इत्यादी अनेक कारणांमुळे पोलीसांचे वैयक्तीक आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या व्याधी होवून शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते .
पोलीसांनी जनतेच्या सुरक्षेचे व्रत घेतलेले असून त्यासाठी ते अहोरात्र झटत असतात . पोलीसांनी जनतेच्या सुरक्षे सोबतच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे , त्यासाठी मैदानी खेळ खेळून आपलो शरीरयष्टी उत्तम ठेवणे गरजेचे असते . त्याच प्रमाणे मैदानी खेळ खेळल्यामुळे आपली शारीरिक स्थिती उत्तम राहाते व मानसिक ताण तणाव देखील दुर होतो , म्हणून पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी आपल्या दैनंदिन कामकाजातून मैदानी खेळांसाठी थोडा वेळ काढुन मैदानी खेळ खेळावे . तसेच खेळामुळे सांधिक काम करण्याची वृत्तीत वाढ होते असे सांगून,
पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले . तसेच परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये सांघिक व वैयक्तिक खेळातून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंची निवड करण्यात येत असते . प्रत्येक खेळाडूंनी पंचांच्या निर्णयाला अंतीम निर्णय समजून खेळाडू वृत्ती दाखवावी .
तसेच परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धे नंतर होणाऱ्या आंतरविभागीय पोलीस क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील प्रत्येक पोलीस खेळाडूंनी नाशिक परिक्षेत्राचे त्याच बरोबर महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव लौकीक करावे अशी अपेक्षा,पो. अधीक्षक पी . आर . पाटील यांनी व्यक्त केली .
दि. 31ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर रोजी दरम्यान पोलीस मुख्यालय , नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या जाणाऱ्या 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धे मध्ये नंदुरबार , धुळे , जळगांव , अहमदनगर , नाशिक ( ग्रामीण ) , नाशिक शहर असे एकुण 06 संघ सामील होणार आहेत .
सदर स्पर्धे दरम्यान सांधिक व वैयक्तिक खेळ , यामध्ये स्विमींग , कुस्ती , ज्युडो , बॉक्सींग , वेटलिफ्टींग , 100 , 200 , 400 800 मीटर धावणे , फुटबॉल , हॉकी , व्हॉलीबॉल इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे .
प्रत्येक संघा मध्ये साधारणत : 90 खेळाडू असे एकुण 240 सांघिक व वैयक्तिक खेळाडू सहभाग घेणार आहेत . तसेच खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती राहावी तसेच पोलीस दलाचा नावलौकिक राहावे याकरीता सर्व खेळाडूंनी शपथ घेतली .
तसेच सदर स्पर्धेची सांगता ही दि. 04 नोव्हेंबर रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, डॉ.बी . जी . शेखर यांचे उपस्थितीत होणार आहे . परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सांधिक व वैयक्तिक खेळातून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंची आंतर विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात येत असते …..



