DPT NEWS Network. प्रतिनिधी – उमेश महाजन
जळगाव : जळगाव जिल्ह्यात फटाके फोडण्याच्या कारणावरून शिरसोली नाका येथे तरूणावर चाकूने वार करून खून करणार्या फरार संशयित महिला सतकौर जगदिशसिंग बावरी यांना मनमाड शहरातून पळून जाण्यापुर्वीच मंगळवारी अटक केली. दरम्यान, यातील एक संशयित अद्याप फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.
शहरातील शिरसोली नाका परिसरातील सदगुरू कॉलनीत दि.25 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झाले.
त्यानंतर मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, मोनुसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी, सतकौर जगदीशसिंग बावरी, सोनुसिंग जगदीशसिंग बावरी सर्व रा. शिरसोली नाका, सदगुरु कॉलनी जळगाव यांनी वाद घातला. यात संतापाच्या भरात मोहनसिंग बावरी, मोनुसिंग बावरी, जगदीशसिंग बावरी यांनी मिळून संजयसिंग प्रदीपसिंग टाक याच्या पोटावर चाकूने वार करून खून करत दगडफेक केली.
खून झाल्यापासून संशयित आरोपी हे फरार झाले होते. यातील संशयित आरोपी मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, मोनुसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी या तिघांना यापुर्वीत अटक केली होती तर संशयित महीला आरोपी सतकौर जगदीशसिंग बावरी या फरार होत्या.
लपून बसलेल्या महिलेला घेतले ताब्यात
संशयित महिला या मनमाड शहरातील मोठे गुरुद्वारा परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोना विकास सातदिवे व महीला पोकॉ सपना ऐरगुंटला आदींच्या पथकाने मनमाड गाठत स्थानिक पोलिसांच्या मदतीने महिला आरोपीस अटक केली आहे. मनमाड शहरातील मोठे गुरुव्दारा भागात ती लपली होती. पोलिस पथक आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने पाठलाग करत तिला ताब्यात घेत अटक केली.



