नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नंदुरबार येथील 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा अंतीम टप्प्यात …



प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार -: पोलीस मुख्यालय , नंदुरबार येथील मैदानावर दि. 31 ऑक्टोबर रोजी पासून सुरु असलेली 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा अंतीम टप्पयात आली असून दिनांक 03 नोव्हेंबर रोजी दिवसभरात पुरुष आणि महिला गटातील वैयक्तिक व सांधीक खेळाच्या प्रकारांमध्ये चुरस निर्माण झालेली पाहायला मिळाली .
पुरुष आणि महिला गटातील वैयक्तिक व सांघीक खेळाच्या क्रीडा प्रकारात परिक्षेत्रातील सर्व संघा मध्ये सर्व साधारण विजेतेपद कोणत्या जिल्हा पोलीस दलाकडे जाते याची उत्सुकता निर्माण झाली आहे .
दि. 03 नोव्हेंबर गुरुवारी नंदुरबार शहरातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडलेल्या कुस्ती या क्रीडा प्रकारात 50 KG गटात नंदुरबार येथील निंबाबाई वाघमोडे प्रथम तर अहमदनगर येथील शितल लोखंडे द्वितीय , 53KG गटात नंदुरबार येथील दिपाली सावकर प्रथम व अहमदनगर येथील तारा चंदे द्वितीय , 55 KG गटात धुळ्याच्या दिपाली सोनवणे प्रथम , नंदुरबारच्या सुनिता मोरे द्वितीय , 57 KG गटात नाशिक शहराच्या प्रियंका मोरे प्रथम , 59 KG गटात नाशिक ग्रामीणच्या मनिषा हांडे प्रथम , नाशिक शहराचे शाहवेन बागवान द्वितीय , 62 KG गटात राजश्री शिंदे प्रथम , नंदुरबार येथील मनाली चौधरी द्वितीय , 65 KG गटात नाशिक शहराच्या पूजा शिंदे प्रथम , नंदुरबार येथील कोमल शिंदे द्वितीय , 68 KG गटात धुळे येथील पूजा सांगळे प्रथम , नाशिक शहराच्या ताई भोये द्वितीय , 72 KG गटात नाशिक शहराच्या मयुरी गांगुर्डे प्रथम तर नंदुरबार येथील मोगरा पाडवी द्वितीय स्थानावर राहिले , ज्युदो या क्रीडा प्रकारात पुरुषांच्या 60 Kg वजन गटात धुळे येथील अक्षय उगले प्रथम , नाशिक ग्रामीण संतोष सारस द्वितीय , 66 kg वजन गटात धुळे येथील राकेश मोरे प्रथम , नाशिक ग्रामीण संदीप बनकर द्वितीय , 73 Kg वजन गटात धुळे येथील मयुर चौधरी प्रथम , नाशिक शहर येथील सागर चिंचोले द्वितीय , 81 Kg वजन गटात धुळे, सचिन पाटील प्रथम , नाशिक ग्रामीण संदीप निकुंभ द्वितीय , 90 Kg वजन गटात अहमदनगर शेखर वाघ प्रथम , नाशिक ग्रामीण प्रवीण भोईर द्वितीय , 100 Kg वजन गटात अहमदनगर सारंग वाघ प्रथम , नाशिक ग्रामीण विकास शिंदे द्वितीय , 100 + Kg वजन गटात नाशिक ग्रामीण प्रमोद आकाड प्रथम , अहमदनगर अमोल गाडे द्वितीय क्रमांकावर राहिले . तसेच ज्युदो या क्रीडा प्रकारात 70 KG वजन महिलांच्या गटात नाशिक शहर माधुरी गांगुर्डे प्रथम , अहमदनगर कविता साठे द्वितीय , 77 KG वजन महिलांच्या गटात नाशिक शहर सुनिता साबळे प्रथम , अहमदनगर येथील छाया गायकवाड द्वितीय , 70 KG वजन महिलांच्या गटात नाशिक शहर माधुरी गांगुडे प्रथम , अहमदनगर कविता साठे द्वितीय क्रमांक पटकविला आहे .
ज्युदो या क्रीडा प्रकारात महिला व पुरुषांच्या गटात नाशिक शहर 20 गुण घेवून प्रथम क्रमांक , अहमदनगर 16 गुण घेवून द्वितीय व नंदुरबार 13 गुण घेवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले , बास्केटबॉल या क्रीडा प्रकारात महिलांच्या गटात नाशिक शहर व नाशिक ग्रामीण यांच्यातील सामना बरोबरीत सुटला .
नंदुरबारच्या संघाने धुळेच्या संघावर , अहमदनगरच्या संघाने जळगांवच्या संघावर विजय मिळविला .
तसेच पुरुषांच्या गटात नाशिक शहरा ने नाशिक ग्रामीणच्या संघावर . धुळ्याच्या संघाने नंदुरबारच्या संघावर तर अहमदनगरच्या संघाने जळगांवच्या संघावर विजय मिळविला .
फुटबॉलच्या सामन्यांमध्ये नाशिक ग्रामीणच्या संघाने अहमदनगरच्या संघाचा , धुळ्याचा संघाने नाशिक शहरचा , जळगांवच्या संघाने नंदुरबारच्या संघाचा पराभव केला . व्हॉलीबॉलच्या पुरुषांच्या सामन्यांमध्ये नाशिक शहर ने अहमदनगरच्या संघाचा , नंदुरबारच्या संघाने नाशिक ग्रामीणच्या संघाचा , जळगांवच्या संघाने धुळ्याचा संघाचा पराभव केला .
दि. 31ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर रोजी खेळवील्या गेलेल्या सामन्यांमधील पात्र असलेले संघ दि. 04 नोव्हेंबर रोजी अंतीम सामने खेळविले जाणार असून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ . बी . जी . शेखर पाटील , नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे हे देखील उपस्थितीत राहणार आहेत .
तरी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व क्रीडा प्रेमींनी दिनांक. 04 नोव्हेंबर रोजी पोलीस कवायत मैदानावर होणाऱ्या 33 वी नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभ प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन,


पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले आहे .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:31 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!