प्रतिनिधी – भुवनेश दुसाने
जळगाव : भुसावळ शहरातील एका भागात राहणारी अल्पवयीन मुलीशी मैत्री करून जबरी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका भागात राहणारी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह राहायला आहे. शहरातील राज लोणारी याने अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला विश्वासात घेवून तापी नगर भागात स्टुडीओत नेत तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता. तसेच अत्याचार केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून तिचा विनयभंग केला. तसेच पिडीत मुलीच्या आई – वडीलांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पिडीत मुलीने आईवडीलांसोबत भुसावळ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी राज लोणारी याच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.