
Dpt news network संपादक – युवराज देवरे मो. 7588007576
प्रतिनिधी – अकिल शहा
*साक्री :* प्रज्ञावान आघाडी पिंपळनेर मंडल भारतीय जनता पक्षाच्या वतीने पदवीधर मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळनेर मंडलाचे अध्यक्ष इंजि. मोहन सूर्यवंशी होते प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सरचिटणीस शेलेंद्र अजगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, सरपंच देवभाऊ सोनवणे, मोतीलाल पोतदार, रामकृष्ण एखंडे, देवेंद्र गांगुर्डे, संजय ठाकरे, योगेश बधान, श्याम पगारे, बापू मालचे, पंकज भावसार, शेखर बागुल उपस्थीत होते.
मोहन सूर्यवंशी म्हणाले, पदवीधरांना योग्य न्याय मिळावा यासाठी पदवीधर मतदार नोंदणी करावी. त्याच्या माध्यमातून आपल्या समस्येचे निराकरण होईल. शेलेंद्र अजगे म्हणले, पदवीधर मतदार संघ हे युवकांसाठी हवकाचे व्यासपीठ आहे.
पाकार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण शिनकर, सुरेश पुराणिक, शेखर बावीस्कर, लक्ष्मीकांत अहिरराव, योगेश अमृतकर,योगेश वाघ, सोरभ कोठावदे, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद गांगुर्डे यांनी केले तर आभार प्रशांत कोतकर यांनी व्यक्त केले.



