प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: तालुक्यातील लहान शहादा येथे दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार तालुक्यातील लहान शहादा येथील सुपड्या रतिलाल भील यांनी दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही .
या कारणावरुन सुपड्या भील यांना शत्रुघ्न भरतत भील याने काठीने तोंडावर , हातावर मारुन दुखापत केली . तसेच देवा सुक्राय भील , अंबालाल ताराचंद भील , वसंत भाईदास भील यांनीही हाताबुक्यांनी मारहाण करुन दुखापत केली .
या बाबत सुपड्या भील यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोहेकॉ . कैलास चौरे करीत आहेत .



