नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वाहनाची धडक लागल्याने ; दोघे जखमी..

Dpt News Network
प्रतिनिधी-प्रविण चव्हाण


नंदुरबार -: नवापूर तालुक्यातील पिंपळनेर रस्त्यावर जामतलाव येथे थ्रेसर मशिनला वाहनाने धडक दिल्याने वाहनातील दोघांना दुखापत झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नवापूर तालुक्यातील बोरविहिर येथील दिनेश शंकर गावित हा त्याच्या ताब्यातील वाहनात ( क्र.जी.जे .०५ जेके १३१२ ) सुरेश परेश गावित यांना बसवून पिंपळनेरहून नवापूरकडे जात होता . यावेळी जामतलाव येथील वावडीफळी येथील सुऱ्या नाईक यांच्या घरासमोर रस्त्याच्या बाजूला असलेल्या ट्रॅक्टरला जोडलेल्या थ्रेसर मनिशला वाहनाने धडक दिल्याने अपघात घडला .
घडलेल्या अपघातात दिनेश गावित व सुरेश गावित यांना दुखापत झाली असून वाहनाचेही नुकसान झाले आहे .
याबाबत सुनिल कांतीलाल गावित यांच्या फिर्यादी वरुन नवापूर पोलिस ठाण्यात दिनेश गावित याच्याविरोधात भादंवि कलम २७ ९ , ३३७ , ३३८ , ४२७ , सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:30 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!